अँटी ड्रोन प्रणाली

रात्रीच्या वेळी आकाशामध्ये विना परवाना उडणारे ड्रोनमुळे नागरिकांमध्ये भीतीची परिस्थिती होऊ नये म्हणून या समस्येवर उपाय म्हणून, पुणे ग्रामीण पोलिसांनी परवानगीशिवाय उडणारी ड्रोन खाली पाडण्यासाठी दोन अँटी-ड्रोन बंदुका खरेदी केल्या आहेत.
अँटी-ड्रोन बंदूक इलेक्ट्रॉनिक सिग्नल पूर्णपणे खंडित करते, जे ड्रोन आणि त्याच्या कॅमेऱ्याच्या ऑपरेशनसाठी वापरले जातात. एकदा ड्रोन या सिग्नलपासून वेगळे झाल्यावर ते जमिनीवर खाली उतरते. त्यानंतर पोलिस त्याला ताब्यात घेऊन पुढील तपास करतात.