पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने ५१व्या कोल्हापूर परिक्षेत्र क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. त्याचा सांगता समारंभ दि. २१/११/२०२५ रोजी पोलिस उपमुख्यालय बारामती येथे पार पडला. पारितोषिक वितरण करण्यासाठी अपर पोलीस महासंचालक दळणवळण, तंत्रज्ञान व मोटर परिवहन श्री. दीपक पांडे, पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र श्री. सुनील फुलारी व कोल्हापूर परिक्षेत्रातील सर्व घटकप्रमुख उपस्थित होते. सर्वसामान्य जेतेपद सातारा संघाने पटकावले.