मा.श्री. सुनिल फुलारी.विशेष पोलीस महानिरीक्षक सो, कोल्हापूर परिक्षेत्र,कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.संदीप सिंह गिल्ल. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी कोल्हापूर परिक्षेत्रातील पोलीस उप-अधीक्षक, दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांसाठी 'सायबर फॉरेन्सिक्स' या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.पोलीस अधिकारी यांना पुरेसे ज्ञान प्राप्त होण्याकरिता तसेच त्यांचे मनोबल आणि कार्यक्षमता वाढविण्याकरिता प्रशिक्षण दिनांक ०१/०४/२०२६ रोजी पोलीस उपमुख्यालय, बऱ्हाणपूर (बारामती) पुणे ग्रामीण येथे यशस्वीरित्या संपन्न झाले आहे.या कार्यशाळे दरम्यान श्री.विशाल पांढरे.सायंटिफिक ऑफिसर (F.S.L.) , अॅड. स्वरदा कबनूरकर, अॅड. स्वाती कबनूरकर (सायबर सुरक्षा तज्ञ व सायबर फॉरेन्सिक वकील), श्री. नचीकेत दांडेकर- (सायबर सुरक्षा तज्ञ), श्री. यश शिंदे (एथिकल हॅकिंग व वरिष्ठ सायबर सुरक्षा तज्ञ), श्री. पुष्कराज शर्मा (एथिकल हॅकिंग व वरिष्ठ सायबर सुरक्षा तज्ञ), श्री. घनश्याम जेस्वानी (एथिकल हॅकिंग व वरिष्ठ सायबर सुरक्षा तज्ञ),रेणुका सस्ते (सायबर सुरक्षा तज्ञ) असे तज्ञ मान्यवर उपस्थित होते.