भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमीत्त राष्ट्रीय क्रिडा दिन साजरा केला जातो. सदर राष्ट्रीय क्रिडा दिनाच्या अनुषंगाने दि.२८/०८/२०२६ ते दि.३०/०८/२०२६ या कालावधीमध्ये " एक घंटा मैदान में" आणि " संडेज ऑन सायकल" कार्यक्रम / उपक्रम पुणे ग्रामीण घटकातील शाखा कार्यालयामार्फत मा श्री संदीप सिंह गिल्ल (भापोसे) पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या अध्यक्षतेखाली मा. श्री अविनाश शिळीमकर पोलीस उप-अधीक्षक (गृह), तसेच श्री रविंद्र कोळी, राखीव पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत राबविण्यात आला. एक घंटा मैदान में" आणि " संडेज ऑन सायकल" कार्यक्रम भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने सुरु केलेल्या उपक्रम अनुषंगाने पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या शारिरीक तंदुरुस्ती राखण्यासाठी कवायत मैदान, पाषाण रोड पुणे ग्रामीण याठिकाणी दि. २८/०८/२०२६ रोजी ०७.०० ते ०८.०० वा.च्या स्ट्रेचिंग, वॉकिंग, आणि रनिंग व फिजीकल एक्सरसाईज घेण्यात आली. त्याचप्रमाणे १०० मी, ४०० मी रनिंग घेण्यात आली.