मा.अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडील दिनांक २.३.२०२६ रोजीच्या पत्रान्वये कौशल्य चाचणीसाठी मैदानीमध्ये चाचणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमधून रिक्त पदाच्या १:१५ प्रमाणे निवड करण्याबाबत कळविलेले आहे. त्यामुळे पुणे ग्रामीण घटकातील मैदानी चाचणीमध्ये उत्तीर्ण उमेदवारांमधून रिक्त पदाच्या १:१५ प्रमाणे निवड करुन तात्पुरती निवड यादी प्रसिध्द करणे व प्राप्त आक्षेपानंतर अंतिम निवड यादी प्रसिध्द करण्यास वेळ लागणार असल्याने, नियोजित दिनांक ५.३.२०२६ व दिनांक ६.३.२०२६ ऐवजी सुधारीत कौशल्य चाचणीचा दिनांक नंतर कळविण्यात येईल.