पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस आस्थापनेवरील पोलीस शिपाई यांच्या ६९ रिक्त पदांसाठी पोलीस भरती २०२४-२५ मधील शारीरिक चाचणी, कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी या प्रक्रिया दिनांक १३.०२.२०२६ ते दिनांक १६.०२.२०२६ रोजी घेण्यात आलेल्या आहेत. सदर पोलीस शिपाई भरतीमधील गुणांक्रमे व रिक्त पदांच्या १:१० प्रमाणे लेखी परिक्षेसाठी पात्र झालेल्या ८०८ उमेदवारांची यादी यापुर्वी प्रसिध्द करण्यात आलेली होती. तथापि, त्यामध्ये एका उमेदवारांने त्यांचे नाव खुल्या प्रवर्गात घेतल्याने त्यांचे नाव लेखी परिक्षा अंतिम यादी आलेले नसल्याबाबत आक्षेप घेतलेला आहे. त्यांचा मुळ प्रवर्ग हा इमाव असल्याने त्यांचे नाव इमाव या प्रवर्गात नमूद करुन सुधारणा करण्यात आल्याने सुधारीत शुध्दीपत्रक सोबत जोडलेले आहे.