उमेदवारांना कळविण्यात येते की, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण आस्थापनेवर सन २०२४-२५ मध्ये रिक्त असलेल्या ०३ चालक पोलीस शिपाई पदाची भरती आयोजित करण्यात आलेली होती. सदर पोलीस भरतीच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या मैदानी चाचणी गुणांकनानुसार कौशल्य चाचणीसाठी रिक्त पदांच्या प्रवर्ग निहाय १:१५ प्रमाणे पात्र झालेल्या उमेदवारांची कौशल्य चाचणी घेण्यासाठी निवड यादी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. उमेदवारांची कौशल्य चाचणी IDTR, MIDC Kasarwadi Old Mumbai Pune Hwy, near Hotel Kalasagar, Bhosari Pimpri Chinchwad, Maharashtra- ४११०३४ येथे दिनांक १०/०३/२०२६ व दिनांक ११/०३/२०२६ रोजी सकाळी ५:३० वाजता आयोजित करण्यात आलेली होती. परंतु प्रशासकिय कारणास्तव उमेदवारांची कौशल्य चाचणी दिनांक १०/०३/२०२६ व दिनांक ११/०३/२०२६ रोजी सकाळी ५:३० वाजता ऐवजी सकाळी १०:०० वाजता अयोजित करण्यात आलेली आहे. तरी उमदेवारांनी दिलेल्या वेळेनुसार उपस्थित राहवे.