पोलिस मुख्यालय
पुणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस मुख्यालय पुण्यात आहे. पोलीस मुख्यालयात काम करणाऱ्या पोलीस कर्मचार्याचे प्रमुख कर्तव्य पुढील प्रमाणे १. आरोप पार्टी २. विविध बंदोबस्त ३. गार्ड ड्युटी ४. अंगरक्षक ५. एस्कॉर्ट ड्यूटी आणि इतर अनेक नियमित कर्तव्य. तसेच मूलभूत प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन करणे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस मुख्यालयात रिझर्व्ह पोलीस दल उपलब्ध करून दिला जातो. पोलीस मुख्यालयाच्या आवारात पोलीस कॅंटीन, स्टोअर आहे. पोलीस मुख्यालयावर पोलीस उपअधीक्षक (गृह) यांचे नियंत्रण असते.